गझलांचे समीक्षण – गझलकार प्रदीप निफाडकर
खुशी के दौर दौरे से है यां रंजों मुहन पहिले
बहार आती हैं पीछे और खिजां गिरदे चमन पहिले
(भावानुवाद – आनंदाचे क्षण नंतर आहेतच, प्रथम कष्ट, प्रयत्न हवेत. बागेभोवती आता पानगळ आहे. पण लक्षात ठेवा वसंत ऋतु मागोमाग येत आहे.)
मुहिब्बाने वतन होंगे हजारों बेवतन पहिले
फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले
(गझलेत पहिल्या दोन्ही ओळींना मतला म्हणतात. पुन्हा तशाच दोन ओळी आल्या तर त्याला सानी मतला म्हणतात. स्वातंत्र्यवीर हे सारे कधी शिकले असतील, असो. अर्थ पाहा – या देशावर प्रेम करणारे खूप होतील, पण आधी हजारोंना निर्वासित व्हावे लागेल. आपल्या भारताची भरभराट होईल. पण प्रथम अंदमान भरेल तेव्हा कुठे. इथे हे आवर्जून सांगायला हवे की, यमकासाठी अंदमान या शब्दास अंदमन शब्द केलेला नाही तर तेव्हा हिंदीत अंदमनच म्हणत. हे यमक (उर्दूत त्याला काफिया म्हणतात) किती सुंदर वापरले आहे)
अभी मेराजका क्या जिक्र, यह पहिली ही मंझिल हैं
हजारों मंजिलों करनी हैं ते हमको कठन पहिले
(अजून शिखराच्या गोष्टी का करता, आता आम्ही काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आलो, ही पहिली पायरी आहे. हजारो पाय-या अडथळे पार करण्याचे ठरवल्याशिवाय काही होणार नाही.)
मुनव्वर अंजुमन होती हैं, महफिल गरम होती हैं
मगर कब जब के खुद जलती हैं, शमा-ए-अंजुमन पहिले
(अहो, मैफिल केव्हा सुंदर दिसते, तिला शोभा कधी येते, जेव्हा मेणबत्ती स्वतःला जाळून घेते, आपल्यालाही तसेच करावे लागेल.)
हमारा हिंद भी फूले फलेगा एक दिन लेकिन
मिलेंगे खाक में लाखों हमारे गुलबदन पहिले
(आमच्या भारत देशाचीसुद्धा एक दिवस भरभराट होईल. पण आधी आमच्यासारखे लाखो सुकुमार धुळीत मिळायला हवेत.)
उन्ही के सिर रहा सेहरा, उन्हीं पे ताज कुर्बा हो
जिन्होंने फाडकर कपडे रखा सिरपर कफन पहिले
(त्यांच्याच माथ्यावर सेहरा बांधला जाईल, त्यांच्याच माथ्यावर मुकुट ठेवला जाईल. ज्यांनी देशोन्मादात कपडे फाडून डोक्यावर कफन चढवले आङे. मरणाला तयार झाले आहेत.)
न हो कुछ खौफ मरनेका, न हो कुछ फिक्र जीने की
अगर ऐ हमदमों मन में लगी हो यह लगन पहिले
(माझ्या साथीदारांनो, ज्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग फुलले आहे, त्यांना ना मृत्यूचे भय असते, ना जगण्याची चिंता)
हमारा हिंदभी युरोपसे ले जायेगा बाजी
तिलक जैसे मुहिब्बाने वतन हो इंडियन पहिले
(आमचा प्राणप्रिय भारत युरोपपेक्षा अधिक प्रगती करेल पण त्यासाठी लोकमान्य टिळकांसारखे देशावर प्रेम करणारे निर्माण व्हावे लागतील)
न सहत की करे परवा, न हम दौलत के तालिब हो
करे सब मुल्क पर कुरबान तन मन और धन पहिले
(आपण सर्वांना पैशामागे लागता कामा नये, एवढेच नव्हे तर आरामाची पर्वाही करू नये. प्रथम आपण भारतभूवर जीव ओवाळून टाकू या. तनमनधनाने तिची सेवा करू या)
हमे दुःख भोगना लेकिन हमारी नस्ले सुख पाने
यह मनमें ठान लें अपने ये हिंदी मर्दोजन पहिले
(आपण सर्व भारतीयांना मनोमन एकच गोष्ट पक्की कोरून ठेवायला हवी की, आम्ही दुःख भोगल्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्या सुखी होणार नाहीत)
मुसीबत आ, कयामत आ, कहाँ जंजीरों, जिंदा हैं
यहां तैय्यार बैठे है, गरीबाने वतन पहिले
संकटांनो या, प्रलयातूनही ये, तुरूंगातल्या बेड्या काय बेड्या आहेत, आम्ही निर्वासित अगदी तुमच्या सामन्यासाठी तयार होऊन बसलो आहोत.
हिंदोस्ताँ मेरा
यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयाँ मेरा
मैं बंदा हिंदवाला हूँ, यह हिंदोस्ताँ मेरा
(भावानुवाद – प्रलयाचा दिवस येईल, तेव्हाही तुम्ही माझी वाणी हेच बोलताना बघाल की मी हिंदुस्थानचा आहे. हा हिंदुस्तान माझा आहे.)
मैं हिंदोस्ताँ के उजडे खंडहर का एक जरां हूँ
यही सारा पता मेरा, यही नामोनिशां मेरा
(मी म्हणजे हिंदुस्थानच्या उजाड झालेल्या भग्नावेषातील एक कण आहे. माझा ठावठिकाणा हाच आहे. माझा परिचय हाच आहे)
मेरा है रक्त हिंदी, जात हिंदी, ठेठ हिंदी हूँ
यही मजहब, यह फिर्का, यही हैं खानदाँ मेरा
(माझे रक्त हिंदुस्थानी आहे. माझी जात तीच आहे. मी संपूर्ण हिंदी आहे, हाच माझा पंथ, धर्म आणि हेच माझे खानदान आहे)
कदम लूँ मादरे हिंदोस्ताँ की बैठते उठते
मेरी ऐसी कहाँ किस्मत, नसीबा यह कहाँ मेरा
(उठता-बसता मी माझ्या मायभूमीची खुशाली घ्यावी, ही इच्छा आहे. पण माझे नशीब असे कुठे, तेवढे माझे भाग्य कुठे)
तेरी सेवामें ऐ भारत अगर सर जाये तो जाये
तो मैं समझू कि हैं मरना हयाते-जाविदाँ मेरा
(हे भारतमाते तुझी सेवा करताना मृत्यू आला तर मला दुःख तर होणार नाहीच पण उलट मला वाटेल की मी अमर झालो)
या दोन्ही गझला परिपूर्ण गझला आहेत. ज्याला उर्दूत मुसलसल गझला म्हणतात, तशा या मुसलसल म्हणजे एकाच विषयावरच्या आहेत. गझलेतील यमक – अत्ययमकांना उर्दूत काफिया-रदीफ म्हणतात. या गझलांमध्ये ते व्यवस्थित पाळले आहेत. पहिल्या गझलेत मुहन-चमन-अंदमन-कफन हे काफिये आहेत. दुस-या गझलेत बयाँ-निशाँ-कहाँ-जाविदाँ हे काफिये आहेत. पहिल्या गझलेत पहिले तर दुस-या मेरा ही रदीफ आहे. दोन्ही गझला हझज मुसम्मन सालिम या उर्दू वृत्तात आहेत. हझज म्हणजे गोड सुरेल आवाज. मुसम्मन म्हणजे आठ कोन आणि सालिम म्हणजे परिपूर्ण. उर्दूत अनेक गझला या वृत्तात आहेत.
स्वातंत्र्यवीरांनी ते वृत्त व्यवस्थित सांभाळले आहे.
आता स्वातंत्र्यवीरांची एक कविताही त्याच वहीत आहे. कवितेचे शीर्षक आहे, हमी (हम ही) हमारे वाली हैं. ती कविता खालील प्रमाणे.
जीती दुनिया उसी सिकंदर पर भी जो के शेर हुआ
भागे युनानी भारत आके जो न तनीक भी देर हुआ
महाराज कहाँ वो आज श्री चंद्रगुप्त बलशाली हैं
रक्त रक्त में अपने भाई हमी हमारे वाली हैं
जापान, जावा, चीन, मेक्सिको चरणों पर था झूल रहा
जिस भारत के, देश जहाँ था हैं वो आज भी भाई वहाँ।।
सुवर्णभूमी खाना पीना, गंगा देने वाली हैं
फिर देर क्यों, उठो भाई, हमी हमारे वाली हैं।।
बीज वहीं हैं, रक्त वहीं हैं, देश वहीं हैं देवों का
सिरफ ठिलाई अपनी खुद की देती हमको हैं धोका।
एक दो नहीं। तीस कोटी हम हिंदी भाई भाई हैं
रोके हम को कौन, कौममें ताकत ऐसी आयी हैं।।
उतनेमें से एक कोटी भी होंगे जो नवयुवा खडे
धीरजमें रणमरणतेज में एक एकसे चढे बढे।
सिरफ करेंगे हुकूम, लाओ बे भारत का हैं ताज कहाँ.
पावोगे वो आजादीका ताज आज के आज यहाँ।।
हन्ता रावण का हैं अपना राम वीरवर सेनानी
कर्मयोग का देव हैं, स्वयं कृष्ण सारथी अभिमानी।
भारत तेरे रथको सेना कौन रोकनेवाली हैं
फिर देर क्यों, उठो भाई, हमी हमारे वाली हैं।